तंत्रविश्व भाग 1: गरज तंत्रसाक्षरतेची

तंत्रविश्व भाग 1

गरज तंत्र साक्षरतेची


तंत्रज्ञान जसे बदलत आहे तसे त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे लोकांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे बदलत्या  तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा अगर करू नका परंतु दुसऱ्या कोणाकडून त्याचा गैरवापर केला जाऊन तुम्ही फसवले जाऊ नये असे वाटत असल्यास तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक ठरते. कारण प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या बाबतीत उदासीन असणाऱ्या किंवा अर्धवट माहिती असलेल्या व्यक्तीचीच आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसून येते.Atm,डेबिट कार्ड, फोन पे,गुगल पे,भीम ऑनलाइन बँकिंग,ऑनलाईन शॉपिंग यांसारख्या अनेक माध्यमातून ही फसवणूक होते आहे.

केवळ शहरापूरते मर्यादित असलेले इंटरनेटचे विश्व आता खेडोपाडी पसरत चालले आहे.अशावेळी या सुविधा

वापरताना केवळ त्या कशा वापरायच्या एव्हढीच पूर्ण माहिती न घेता त्याच्यापासून फसवणूक कशी होते हे जाणून घेणे आणि त्यादृष्टीने त्यांचा सुरक्षित वापर समजून घेणे आवश्यक ठरते.


अशावेळी एक प्रश्न निर्माण होतो की नक्की कोणत्या गोष्टी समजून घ्याव्या की ज्यामुळे फसवणूक टाळता येईल.कारण तंत्रज्ञानाचे विश्व अमर्याद आहे .अशा वेळी सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे सर्वसामान्य व्यक्तींना शक्य नसते आणि ते आवश्यकही नसते. अशावेळी ज्या गोष्टीचा तुम्ही दैनंदिन जीवनात वापर करता अशा गोष्टींविषयी माहिती करून घेणे आणि त्या गोष्टीमध्ये झालेले अपडेट माहित करून घेणे या पर्यायाचा तुम्हाला अवलंब करता येईल.

 सर्वसामान्य व्यक्तींना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचे हे विषय पुढीलप्रमाणे सांगता येतील.

1.मोबाईल बँकिंग

2.Atm कार्ड,डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड

3.इंटरनेट बँकिंग

4.ऑनलाइन शॉपिंग

5.ई वालेट्स

6.यूपीआय सिस्टिम

7. पॅनकार्ड,आधारकार्ड यासारख्या सरकारी सुविधा

8.सोशल मीडिया

याशिवाय असे अनेक छोटे विषय जे तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतील, अशा विषयाबाबत माहिती करून घेणे अणि स्वतःला अपडेट ठेवणे काळाची गरज बनत चालली आहे.

 प्रस्तुत 'तंत्र विश्व' या लेखमालेतून असे तंत्रज्ञान सोप्या भाषेत समजून सांगणारे लेख लिहिण्याचा माझा प्रयत्न आहे.


Comments

Popular Posts